पुणे,दि.०६ :- पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे उत्सवाच्या काळात खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलिसांच्या बैठकीत नुकतीच केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविला आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारपासून (७ सप्टेंबर) होणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महिनाभरापासून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
व गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर दिनांक 7, 17, 18 सप्टेंबरला पुण्यात दारू विक्रीला बंदी असणार आहे. फरासखाना, विश्रामबाग, खडकी या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व दारूची दुकाने गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात येणार आहे