पुणे, दि. २०: कृषी विभाग व रोटरी कॅम्प डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोटरी मिलेट जत्रा २४’ चे आयोजन २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वा. गांधी भवन, कोथरूड येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
यावेळी सहनिबंधक स्नेहा जोशी, जिल्हा उपनिबंधक अमोल यादव, रोटरी प्रांतपाल रो. शितल शहा, पुणे कॅम्प रोटरी क्लबचे अध्यक्ष वैशाली रावल आदी उपस्थित राहणार आहेत.
भरड धान्य उत्पादक शेतकरी, उपपदार्थ उत्पादक व ग्राहक यांना एकत्रित व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या एक दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी मिलेट जनजागृती प्रभात फेरी, भरडधान्य पाककला व पोस्टर स्पर्धा, मिलेट व्यवसाय संधी पॅनल चर्चा, लोकनृत्य व लेझीम लाठीकाठी प्रदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
भरड धान्यापासून बनवलेल्या पौष्टिक रुचकर पदार्थांची चव चाखण्याची व शिकण्याची ही सुवर्णसंधी असून नागरिकांनी या संधीचा लाभ द्यावा, असे आवाहन श्री. काचोळे यांनी माहिती दिली आहे.