अहमदनगर दि १३ :- वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणाचे आणि पृथ्वीचे , पर्यायाने आपले स्वतःचे आणि भावी पिढीचे संरक्षण करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे . वृक्षारोपण करण्याचे उदात्त कार्य करने . ही खरोखर अभिमानस्पद आणि सुजान नागरिकांची कर्तव्य दक्षता आहे. परंतु दर वर्षी लाखोंच्या संख्येत वृक्षारोपण होते किंवा या संदर्भातील आकडे आपण वाचत असतोच . मग आत्ता पर्यंत लावलेली ही वृक्षवल्ली शम्भर टक्के जगवली असती तर ? तर चित्र नक्कीच निराळे असते . पण असे होतांना दिसत नाही.
असे वाटते , आपण छोट्या छोट्या संख्येत कॉलनी , ऑफीस , शेतीच्या बांधावर वृक्षारोपण करून त्यांची शंम्भर टक्के जोपासना केली तर उद्देश साध्य होउन चित्र नक्कीच बदलेल .
वृक्षा रोपणाचे केवळ फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा जबाबदार आणि सुजान होऊन पर्यावरण रक्षणासाठी प्रामाणिक पणे कर्तव्यदक्ष राहून या अभियानात सामील झाले पाहिजे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. राम शिंदे साहेब, जिल्हाधिकारी श्री.राहुल द्विवेदी, उप वनसंरक्षक अधिकारी श्री.आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी सौ.कीर्ती जमधाडे, सहाय्य्क वनसंरक्षक अधिकारी श्री.रमेश देवखिळे तसेच इतर शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, सेंट झेवियर हायस्कुल व केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले.
प्रतिनिधी- कमलेश नवले, नेवासा