.शिर्डी दि,१९:- शिर्डी येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.सावळीविहीर शिवारात सोमय्या हायस्कूलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दरोड्याच्या तयारीत असतांना त्यांना शिर्डी पोलिसांनी दोन धारदार चाकू, एक लोखंडी गज,एक नायलॉन ची दोरी, व मिरचीची पूडसह पाच जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याजवळील साहित्य जप्त करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची लगभग सुरु असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि दिपक गंधले,पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, चालक पोहेको काकड, पोना मयूर गुंजाळ,पोना गजानन वाळके,पोना बाबासाहेब सातपुते,पोको अजय अंधारे, असा सर्व पोलीस स्टाप शहरात पेट्रोलिंग करीत असतांना उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि सावळीविहीर गावातील सोमय्या हायस्कूलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमून बसलेले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच स.पो.नि. दिपक गंधले यांनी तातडीने दोन पंचांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांना सर्व हकीकत समजावून सांगितली.त्याप्रमाणे शिर्डी पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजता सावळीविहीर परिसरात सापळा रचला असता काही इसम तेथे दिसून आले मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले यावेळी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करीत पाचही इसमांना पकडले असता त्यांची झाडाझडती घेतली यावेळी त्यांच्याकडून अंगझडतीत दोन धारदार चाकू, एक लोखंडी गज,एक नायलॉन दोरी, व मिरची पूड मिळून आली असून त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने त्यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली असून अटक करण्यात आलेल्यामध्ये विहार रविकिरण मून वय-२१ रा. हिंगणगाड, ता.जी.वर्धा, किशोर पुंजाराम जाधव वय- ३३ रा.येळी जांभळी,ता.पाथर्डी,गणेश प्रभाकर यादव वय- ३० रा. संजयनगर, अहमदनगर, भारत बळीराम वैद्य वय- ३५ रा.चौरीपलाट,ता.जी. अकोला,सुदेश संजय कांबळे वय- ४५ रा. माळीवाडा,अहमदनगर असे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तक्रारदार मयूर गुंजाळ ब.नं. ११४२ यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांत गु.र.नं. ७५२/ २०१९ भाद्वी कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे