मुंबई, दि. १९ :- येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ पुढील काही वर्षात पोलिओ लसीच्या सुमारे 508 दशलक्ष इतक्या डोसेसचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. यासाठी केंद्र शासनासह युनिसेफ आणि मोझाम्बिक देशाकडून महामंडळास नुकतेच पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी हाफकिन महामंडळास नुकतीच भेट देऊन महामंडळाच्या सक्षमीकरणासंदर्भात ग्वाही दिली होती. मंत्री श्री. रावल यांच्यासह राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख आदींच्या माध्यमातून महामंडळाच्या विकासासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पोलिओ लस पुरवठ्यासह आता इतर लसी आणि ओषधांच्या निर्मितीसाठीही महामंडळाने पुढाकार घेतला आहे.
भारतातील पोलिओ लस तसेच इतर जीवरक्षक लसी व विविध प्रकारची औषधे बनविणारी हाफकिन महामंडळ ही अग्रगण्य कंपनी आहे. तसेच अशा प्रकारचा भारतातील हा एकमेव सार्वजनिक उपक्रम आहे. महामंडळास जागतिक आरोग्य संघटनेचे मानांकन प्राप्त आहे. मागील चार दशकापासून हाफकिन महामंडळ हे भारत सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावार पोलिओ लसीचे उत्पादन करुन देशभर पुरवठा करत आहे. भारतास पोलिओमुक्त करण्यामध्ये महामंडळाने मोठे योगदान दिले आहे. तसेच युनिसेफमार्फत महामंडळ आशिया, आफ्रिका व लॅटीन अमेरिका या खंडातील अनेक देशामध्ये पोलिओ लसीचा पुरवठा करत आहे. या माध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठे योगदान देत आहे.
महामंडळाने स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी काढलेल्या 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या वर्षासाठीच्या पोलिओ लस पुरवठा निविदेमध्ये भाग घेतला व यशस्वी निविदाधारक ठरला आहे. त्यामुळे महामंडळास पुढील तीन वर्षासाठी (2019-20, 2020-2021 व 2021-2022) पोलिओ लसीच्या 368 मिलियन डोसेसचे (bOPV1&3) पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 200.46 कोटी रुपये आहे. तसेच महामंडळास युनिसेफमार्फत 66 मिलियन डोसेसचे 2019-20 साठीचे पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत. ज्याचे मूल्य 50.86 कोटी रुपये आहे. याशिवाय अजून अतिरिक्त 60 मिलियन डोसेस पोलिओ लसीचे भारत सरकारकडून पुरवठा आदेश अपेक्षित आहे. 13 मिलियन डोसेस हे मोझाम्बिक या देशास निर्यात आदेश अपेक्षित आहेत. हे पुरवठा आदेश पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
वर्ष
पोलिओ लस (bOPV1&3)
पुरवठा आदेश
मुल्य
2019-20
112.5 मिलियन डोसेस+अतिरिक्त 60 मिलियन डोसेस अपेक्षित
भारत सरकार
रु.93.84 कोटी
60 मिलियन डोसेस+6.2 मिलियन डोसेस (mOPV1)
युनिसेफ
रु.46.20 कोटी
रु.4.66 कोटी
13.35 मिलियन डोसेस
मोझाम्बिक (निर्यात)
रु.10.98 कोटी
2020-21
166 मिलियन डोसेस
भारत सरकार
रु.90.30 कोटी
2021-22
90 मिलियन डोसेस
भारत सरकार
रु.48.96 कोटी
एकूण
508मिलियन डोसेस
रु.294.94 कोटी
बाळू राऊत प्रतिनिधी