पुणे दि,२९ :- पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांनी गणेशोत्सव व काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता. मात्र, आता ढोल-ताशा पथकांनी त्यामध्ये क्रांती आणली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, आयुक्तांशी चर्चा करून पथकांना पुढील दोन दिवसांत परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन खासदार गिरीश बापट यांनी दिले.ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फे वाद्यपूजनाचा एकत्रित कार्यक्रम राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, आमदार भीमराव तापकीर, स्वरदा बापट-केळकर, नगरसेवक राजेश येनपुरे, दीपक पोटे, ॲड. प्रताप परदेशी, महेश सूर्यवंशी, संजय मते, बाळासाहेब दाभेकर, शिरीष मोहिते, आनंद सराफ, शेखर देडगावकर, विवेक खटावकर, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते.
पंकज देशमुख म्हणाले, ‘‘पोलिसांसोबत गणेश मंडळांचे कार्यकर्ते व ढोल-ताशा पथकांचे वादक यांचा होणारा वाद समन्वयातून सोडविण्यासाठी प्रयत्न करू.’’
ॲड. परदेशी म्हणाले, ‘‘मागील वर्षी गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथकांवर दाखल झालेले खटले रद्द व्हावेत.’’
पराग ठाकूर म्हणाले, ‘‘ढोल-ताशा पथकांमुळे उत्सवात शिस्त निर्माण झाली आहे. उत्सवाला एक महिना राहिला असून, पथकांना दररोज दोन तास सराव करण्याकरिता परवानगी मिळावी.’’
संजय सातपुते, अनुप साठ्ये, अतुल बेहेरे, ॲड. शिरीष थिटे, अक्षय बलकवडे, केतन देशपांडे, आशुतोष देशपांडे, चंद्रशेखर पासलकर यांसह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.