पुणे दि ३०: – पुणे शहरातुन दुचाकी वाहनांची चोरी करुन टु व्हीलरचे बनावट नंबर टाकुन त्या नंबरचे आर.टी.ओ.चे बनावट कागदपत्र बनवून पुणे शहरात व महाराष्ट्रात वाहने विकणारी टोळी दि.२९ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काळे पडळ, हडपसर पुणे या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर माहीती पोलिसांना मिळाली होती व युनिट-५ कडील ३ अधिकारी यांच्या वेगवेगळया टिम तयार करुन काळे-पडळ,जवळीत परिसरात सापळा लावण्यात आल होता. सायंकाळी ५ वाजुन ३० काही मिनिटांनी या दरम्यान पोउनिरी शेडगे,पो.हवा.पठाण, पो.ना.जोगदंडे पो.ना.घाडगे यांनी मिळालेल्या माहीतीचे वर्णनाप्रमाणे शुभम विनोद भंडारे, वय-२५, धंदा-मजुरी, सध्या रा. वैदयवाडा, मोरे हॉस्पीटलच्या बाजुला, कालिकादेवी मंदिराचे पाठीमागे, राघवेंद्र कॉलनी , जुना औसा रोड,लातुर मुळ गाव- भंडारे वाडा,सिव्हिल हॉरपीटल शेजारी, शास्त्रीनगर, परभणी २) चेतन रविंद्र हिंगमिरे, वः -२६, धंदा-मजुरी,सध्या रा.पहिलवान जिम् समोर, म्हसोबा कॉलनी, काळे पडळ, हडसर पुणे मुळ गाव-हिंगमिरेवाडा, गुरुवार पेठ, गणपती मंदिरासमोर, तासगांव जि.सांगली हे नंबर नसलेल्या बुलेट वरुन येत असताना त्यांना ताब्यात घेतले.असता बुलेटच्या चॅसिस नं. य इंजिनं नंबर वरुन सरकारी अँप वाहन च्या आधारे चेक करून पहिले असता ती टू व्हीलर चोरीची आहे ही खात्री केली असता ती पोलिस स्टेशन, परभणी येथुन चोरली असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे पोलिसांना कबुली दिली आहे त्यांच्या अंगझडती मध्ये गाड्यांचे बानावट तयार केले कागदपत्र (आर.सी.बुक) पोलिसांना मिळाले व त्याची खात्री केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे, पोलिस तपासामध्ये एकुण- २७ मोटार.सायकल किंमत ९ लाख ६५ हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे आरोपीस अटक केली आहे व त्यांच्या इतर दोनसाथीदारांची शोध मोहीम चालू आहे आरोपी यांनी दिलेल्या माहितीवरुन त्यांनी ४० ते ४५ दुचाकी वाहन चोरल्याचे कबुल केले असुन सदरची उर्वरीत वाहने लातुर,परभणी,नांदेड मुखेड या भागात विक्री केली असल्याचे कबुल केले आहे व लवकरच टिम पाठधुन चोरीचे वाहन ज्यांना विकली आहे ते हरतगत करणार आहोत.गुन्हा करण्याची पध्दती- यातील अटक आरोपी क्र.१ व २ व त्या अजुन दोन पहिजे साथीदार हे मोटर सायकल चोरण्याचे काम करीत होते.तसेच यातील अटक आरोपी क्र.२ हा त्या चोरलेल्या गाड्यांचे बनावट कागदपत्रे बनविण्याचे काम करीत होता तसेच सर्वजण मिळेल त्या संधी प्रमाणे जुजबी किमतीमध्ये वाहने विकत होते. काही वाहने चोरुन . त्यांनी उधारीवर पैसे घेेूनव पैसे परत देण्याच्या खात्रिकरीता वाहने संबंधित लोकांकडे ठेवली असल्याची माहिती मिळाले आहे. हि कारवाई . मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री.बच्चन सिह, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२, पुणे शहर श्री.भानुप्रताप बर्गे या मार्गदर्शनाली युनिट ५ प्रभारी अधिकारी वपोनिरी श्री.दत्ता चव्हाण,सपोनिरी.भालचंद्र ढयळे,सपोनिरी, संतोष तासगांवकर,सौउनि सोमनाथ शेंडगे,पो.हवा.संतोषमो हिते,प्रदिप सुर्वे अमजद पठाण,प्रविण शदे,राजेश रणसिंग,दता काटम,राजाभाऊ भोरडे संजय देशमुख,केरबा गलांडे,महेश साळवी, सचिन घोलप,पो ना.प्रमोद गायकवाड,अंकुश जोगदंडे,महेश वाघमारे,दया शेगर,प्रविण काळभोर,प्रमोद घडगे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे,