यवत दि,१२ :- येवत येथे आज रोजी मा. जयंत मीना(भा पो से), अपर पोलीस अधीक्षक सो बारामती यांना यवत येथे मोठया प्रमाणात अवैध रित्या गावठी हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री करीत असलेची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती व बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव आणि श्री भाऊसाहेब पाटील, पो नि यवत पो स्टे यांना सांगून त्या
ठिकाणी रेड करणेस सांगितले. त्या प्रमाणे यवत येथील नांदूर, पारगाव या ठिकाणी अचानक छापा मारला असता त्या ठिकाणी इसम हे हटभट्टीची दारू बनवण्याचे साहित्यांचा वापर करून गावठी हटभट्टीची दारू तयार करून विक्री करत असताना पोलिसांना मिळून आले. व 1) 2,10,000 = 00 दहा हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे नवसागर, काळा गुळ, झाडांच्या साली वगैरे चे तयार केलेले कच्चे रसायन
2) 3000 = 00 साठ लिटर विक्री साठी तयार हातभट्टी दारू
3)6000 = 00 दोन जर्मल थाळी
4) 2000 = 00 दोन दारू गाळण्यासाठी लागणारे चाटु
5) 3000 = लाकडी सरपण
एकूण रुपये 2,24,000/- मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे1)लैला गुडदावत रा नांदूर ता दौंड (फरार)2) अंजु राव नानावत रा भांडगाव दौंड(फरार)सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)
मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती(IPS)
मा.ऐश्वर्य शर्मा सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड(IPS)
यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचेचंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे,पो.कॉ. दशरथ कोळेकर,पो.कॉ. विशाल जावळे
पो.कॉ. शर्मा पवार, आणि,श्री. भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक, पो.ना.संपत खबाले पो.कॉ.उत्तप्पा संकुल, यवत पोलीस स्टेशन आणि जलद कृती दलाचे 5 जवान यांनी केली.