पुणे दि १४ : – पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरातील जुळी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.तर नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ही जुळी मुले कोणाची आहेत, त्यांना तेथे कोण सोडून दिलं याबाबत पोलिसांचा तपास चालू आहे पाषाण परिसरात तलावाजवळ काही नागरिक सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन बाळ होते. त्यांच्या रडण्याचा आवाज नागरिकांना ऐकू आला. त्यामुळे जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी एक मुलगा आणि एक मुलगी जुळे असल्याचे निदर्शनास आले.नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टराना बोलविण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पाषाण परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येथे धाव घेतली. व या मुलांच्या आई वडील यांच्या तपास चतु: शृंगी पोलिस करीत आहे