दि १४ :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण व बनपिंप्री येथे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून ६७ हजार ९०० रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोघांना सापळा रचून श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने अटक केली.याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.११ रोजी रात्री २:३० च्या सुमारास लुटारूंनी मांडवगण ता. श्रीगोंदा येथील एका घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून ३७ हजार ९००
रुपयांचे दागिने व दि ९ रोजी बनपिंप्री ता. श्रीगोंदे येथील घराच्या पडवीतून चाकूचा धाक दाखवून ३० हजार रुपये किंमतीचे दागिने बळजबरीने चोरून नेले.होते व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या लुटारूंचा पोलिसांनी शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोराचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोडवरील नक्षत्र हॉटेलसमोर आरोपी लुटीचा मुद्देमाल विकण्यासाठी येणार आहेत. पोलिसांनी सापळा रचून महेश किरास चव्हाण वय वर्षे २० .अजनुज ता. श्रीगोंदे व सुनिल चांगदेव शेलार वय वर्षे २२ रा. म्हैसगाव ता. राहुरी या आरोपींना शिताफीने पकडून जेरबंद केले. व गुन्ह्यात वापरलेली अपाची कंपनीची MH- १६ AG- ९४४५ मोटारसायकलसहीत सोन्याचे दागिने, चांदीसदृश ५०० ग्रॅम वजनाच्या तेरा प्रकारच्या वस्तू, दोन चाकू, असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.आहे
सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोलीस हवालदार अंकुश ढवळे, संजय काळे, किरण बोराडे, अमोल कोतकर, संजय कोतकर, किरण भापकर, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली. याकामी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोबाईल सेलचे पोलीस हवालदार प्रशांत राठोड यांनी मदत केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पोलीस हवालदार योगेश सुपेकर करत आहेत
श्रीगोंदा प्रतिनिधी :- योगेश चंदन