निरा नरसिंहपूर: दि ,०९ :- प्रतिनिधी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यातील संचलनात महाराष्ट्राच्या पथकाचे परेड कमांडर म्हणून नेतृत्व गगन संतोष डहाळे (बावडा) याने केले.आज रविवारी (दि.8) दिल्लीहून तो बावडा गावी परतला.यावेळी बावडा ग्रामस्थांच्या वतीने नीरा-भीमा कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी त्याचे स्वागत करीत सन्मान केला. याप्रसंगी नीरा भीमा कारखाना संचालक उदयसिंह पाटील, एनसीसी ट्रेनर नंदकुमार गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
बावडा ग्रामस्थांच्या स्वागतानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत व वाजत-गाजत गगन डहाळे याची गावच्या बाजारपेठेमधून मिरवणूक काढण्यात आली.सीनियर अंडर ऑफिसर असलेल्या गगन डहाळे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट संचलन केल्याने गगन डहाळे याच्या नेतृत्वाखालील एनसीसीच्या पथकाला संपूर्ण देशामध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.दरम्यान, बावडा येथे फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने गगन डहाळे याचा सत्कार करण्यात आला.
निरा नरसिंहपूर: प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार