पुणे, १८ जून : गोखलेनगर येथील एकतानगर सोसायटी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून २० वर्षीय हर्षद मच्छिंद्र जाधव याची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२५ रोजी रात्री सुमारे २.३५ वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात इसमांनी हर्षद जाधव याच्यावर लाकडी दांडके, बॅट आणि विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती शीतल जाधव करीत आहेत.


































