पिंपरी-चिंचवड ,दि.०४:- बावधन पोलिसांनी मोटारसायकल व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत तीन सराईत चोरटे आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ३७ मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गस्तीदरम्यान संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी बावधन, हिंजवडी आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे कबूल केले.
या कारवाईत एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे (पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), डॉ. शशीकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), बसवराज तेली (अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग), सारंग आवाड (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), प्रदिप जाधव, (पोलीस उप आयुक्त परि. २), विठ्ठल कुबडे, (सहा. पोलीस आयुक्त) हिंजवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे परवेज शिकलगार, गुन्हे प्रकटीकरण पथक पोउपनि. सारंग ठाकरे, श्रेणीपोउपनि. राजेंद्र काळे, सपोफौ. वापुसाहेब धुमाळ, पोहवा. अरुण नरळे, पोहवा. फारुक मुल्ला, पोहवा. नितीन चंदनशिव, पोहवा. महेश शिंदे, पोहवा. अतिश जाधव, पोशि. दत्ता शिंदे, पोशि. बाबासाहेब पोटे, पोशि. स्वप्निल साबळे, पोशि. अक्षय लाटे, पोशि. ऋषीकेश पाटील, पोहवा मंगेश लोखंडे (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.




























