पुणे,दि.१६ : – मोका गुन्ह्यातील तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार जंगम हे गुन्हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विमानतळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील फरार आरोपी प्रल्हाद उर्फ प्रविण भगवान शिंदे हा धानोरी येथील जकात नाका परिसरात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धानोरी येथील नाल्याजवळील परिसरातून आरोपी प्रल्हाद भगवान शिंदे (वय ३१, रा. धानोरी, पुणे) याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो गेल्या नऊ वर्षांपासून फरार होता.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अविनाश कुमार तसेच सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राकेश कदम यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तसेच पोलीस अंमलदार अमित गायकवाड, अमोल आदर्लिंग, प्रितम जंगम, अल्पेश पोटेकर यांच्यासह इतर पोलिसांनी सहभाग घेतला.



























