पुणे दि.30- पुण्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो उभारणीच्या कामाची विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मेट्रो तज्ञसमिती समवेत पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी समिती सदस्य रणनीतीक शहर व्यवस्थापन केंद्राचे मुख्य शासत्रज्ञ डॉ. रितेश विजय, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे शासत्रज्ञ डॉ. अे. बोनियामिन, पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (महापालिका प्रशासन ) प्रशांत खांडकेकर, मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक हुकुमसिंह चौधरी, पर्यावरण तज्ञ रेणू गेरा, नियोजन व्यवस्थापक संतोष पाटील, संदीप जाधव उपस्थित होते.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मूठा नदीच्या पात्रात 1.45 कि.मी रस्त्यालगत मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार नदी पात्रातील मेट्रो मार्गाच्या बांधकामाकरीता तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे.
नदीपात्रातील पर्यावरणाचा समतोल राखणे तसेच पूरस्थिती उदभवल्यास मेट्रो प्रकल्पास हानी पोहजूनये या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे. याबाबतच्या विविध बाबींवर डॉ. म्हैसेकर यांनी आवश्यक सूचना केल्या. तसेच हरित लवादाने दिलेल्या सूचनांच्या देखील काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांसमवेत, तज्ञसमिती व मेट्रोच्या अघिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नदीपात्रातील पर्यावरण व्यवस्थापन, डेक्कन जिमखाना व संभाजीपार्क येथील मेंट्रोचे थांबे तसेच वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला.