सासवड,दि. ११ :- पुणे ग्रामीण परिसरातील सासवड परिसरात इलेक्ट्रॉनिक दुकान आणि कापड दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला सासवड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अटक केली आहे. राहुल यमणप्पा गायकवाड (वय २६, रा. लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड परिसरातील इलेक्ट्रिकल दुकानातून तांब्याच्या वायरचे बंडल तसेच कापड दुकानातून विविध कंपन्यांचे शर्ट व जीन्स असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड परिसरातील इलेक्ट्रिकल दुकानातून तांब्याच्या वायरचे बंडल तसेच कापड दुकानातून विविध कंपन्यांचे शर्ट व जीन्स असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून तांब्याच्या वायरचे बंडल,
पोलिसांनी आरोपीकडून तांब्याच्या वायरचे बंडल, विविध कंपन्यांचे शर्ट व जीन्स तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ९३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश सोनवणे करीत आहेत.

























