पुणे,दि.१५ :- पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यां पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक २ कारवाई केली आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रोन (एम.डी.) विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
त्यांच्याकडील काळ्या-पिवळ्या रंगाच्या ऑटो रिक्षाची तपासणी केली असता, त्यामध्ये २४.६३ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष अंगझडती व तपासणी केली असता, ४ लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचे मेफेड्रोन, ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, १ लाख ५० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपये रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त गोहेर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण तसेच अंमली पदार्थविरोधी पथक २ मधील पोलीस अंमलदारांनी केली.




























