पुणे, दि.२३ :- पुणे शहरातील एका पक्षाचे सरचिटणीस यांना खंडणी मागणाऱ्यांना पुणे शहर खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
या प्रकरणी जुबेर बाबु शेख यांनी फिर्यादीवरून दीपक विजय निंबाळकर वय २९, रा. निंबाळकरवस्ती,पिसोळी, ता. हवेली गणेश जगताप वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर आणि अमर अबनावे वय२९ रा. उरळी देवाची अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.जुबेर शेख हे एका पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा टाकला होता.तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांना फोन करुन उचलण्यास सांगितले. त्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथिदारांनी ५ लाखांची मागणी केली होती. व शेख यांनी पुणे शहर पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता . दि.२२ रोजी अर्जदार यांना गैरअर्जदार दिपक निंबाळकर याने फोन करुन कान्हा हॉटेल , कात्रज कोंढवा रोड पुणे येथे खंडणीची रक्कम घेवुन बोलाविले व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना सांगितल्याने त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कान्हा हॉटेल , कात्रज कोंढवा रोड पुणे येथे सापळा रचुन दिपक निंबाळकर व त्याचे २ साथीदार यांना तडजोडी अंती ४ लाख रुपये स्विकारताना रंगे हात पकडले .शेख यांनी त्यांचे विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी नामे १ ) दिपक विजय निंबाळकर रा . निंबाळकरवस्ती , पिसोळी , ता . हवेली , जि . पुणे , २ ) गणेश शामराव जगताप रा . महम्मदवाडी , हडपसर पुणे व ३ ) अमर बाळासाहेब अबनावे रा . उरळी देवाची , ता . हवेली , जि . पुणे त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे .. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता ,पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे – २ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २ कडील पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव , शैलेश सुर्वे , प्रदिप शितोळे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , सचिन अहिवळे , सौदाबा भोजराव , अमोल पिलाने , प्रविण पडवळ , प्रदिप गाडे , मोहन येलपल्ले , चेतन शिरोळकर , रुपाली कर्णवर , आशा कोळेकर सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा यांनी केलेली आहे .