पुणे/मुंबई दि.२२:- बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी दि. २० ऑगस्ट रोजी पोलिसांची भेट घेतली होती. त्यांनी संबंधित पीडित कुटुंबांची सुद्धा भेट घेतली होती. याच्यापैकी एका कुटुंबातील महिलेच्या आईचा फोन डॉ. गोन्हे यांना आला होता. त्याचबरोबर नातेवाईकाने देखील सांगितले की पीडित मुलीच्या घराकडे आणि त्यांच्या नातेवाईकांचे पत्ते शोधून काही मीडियाचे प्रतिनिधी सातत्याने घराजवळ घुटमळत आहेत. त्याच्यामुळे आसपासच्या लोकांच्या मनात थोडं संशय तयार झालेला आहे की, पीडित मुलगी हीच असून त्यांचे सदरील घर आहे का काय? त्यांचे नाव, पत्ता माहिती झाल्यामुळे ते कुटुंब चिंताग्रस्त झालेले आहे.
माध्यमांना काही माहिती देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका पीडित कुटुंबाने घेतली आहे. काही देण्याची वेळ आली तर आम्ही ती माहिती पोलिसांना देऊ अशी स्पष्ट भूमिकाच पीडित कुटुंबाने घेतली असल्याची डॉ गोन्हे यांनी सांगितले आहे. त्यामुळे माध्यमाने कुठली माहिती विचारण्यासाठी आमच्याकडे येऊ नये असं त्यांनी त्यांचं भावना डॉ. गोन्हे यांच्याकडे व्यक्त केली असून डॉ. गोन्हे यांनी सदरील संदेशांच्या माध्यमांतून सर्व माध्यमांचे चॅनेल प्रमुख, दैनिकांचे संपादक आणि त्यांचबरोबर बदलापूर मुंबई आणि इतर भागातले प्रतिनिधी यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या कुठले घरी किंवा नातेवाईकांच्याकडे स्वतः जाऊ नये असं आवाहन देखील डॉ. गोन्हे यांनी केले आहे.
पॉस्को आणि बलात्कार विरोधी कायदा या दोन्ही कायद्यांच्या माध्यमातून मुलीची ओळख, तिच्या घरच्यांचा परिचय, त्यांच्या घराचे चित्रीकरण त्यांच्या अन्य नातेवाईक म्हणून त्यांचे चित्रिकरण यामधून मुलींची ओळख जगजाहीर होत असते. अशा परिस्थितीत ओळख जगजाहीर झाल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याला तो धोका होऊ शकतो. पण समाजाचा जो दबाव असतो त्या दबावाचा सुद्धा त्यांना त्रास आणि हानी पोहोचू शकते. त्यामुळे पॉक्सो कायद्यानुसार अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारे माध्यमांमध्ये संबंधित मुलीचा तपशील माहिती होईल किंवा तिच्या नातेवाईकांचे नाव-पत्ते जाहीर होतील किंवा नाव-पत्ते जाहीर न करता कुठल्याही फोटो ब्लर केला आणि आम्ही दाखवलं अशा कारणामुळे या गोष्टीला परवानगी नाही. हे डॉ गोहे यांनी सदरील संदेशातून नमूद केले आहे. तरीही काही माध्यमांनी जर का तसा प्रयत्न केला आणि आमच्या निदर्शनाला आला तर त्याची दखल पोलिसांच्याकडे सुद्धा वेळ प्रसंगी जाणारच आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये माध्यमाने पीडित मुलींच्या घरी आसपास जाणं त्या काही निमित्ताने जाण आहे टाळावं असे सर्व माध्यम प्रतिनिधी यांना डॉ. गोन्हे यांनी आवाहन केले आहे.