पुणे बारामती,दि.१६: – काय काय जणांनी तर कालच्या सभेला पाचशे रुपये देऊन महिलांना सभा ऐकायला आणले.. माझ्या समोरील बसलेल्या महिला काय पैसे देऊन आल्यात काय..! स्वतःहून प्रेमापोटी आल्या आहेत.माझ्या शब्दावर विश्वास आहे म्हणून आल्या आहेत. मी 1967 पासून अनेक निवडणुका बघितल्या.चढउतार आले. लाटा आल्या गेल्या. त्या काळात सुरुवातीला इंदिराजींची लाट आली.राजीव गांधींची लाट आली. 2014 ला मोदींची लाट आली. मात्र आपण कोणाला पैसे देऊन आणले नाही. असले प्रकार मी बारामतीत कधी चालू दिले नाहीत. आपण प्रेमाने माणसं जोडतो. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर आरोप केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार योगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत कालमहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारो महिलांनी सहभाग नोंदविला. मात्र या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना पाचशे रुपये देऊन कार्यक्रमाला बोलावलं असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की अजून तर यांना काहीही माहित नाही. जेवणावळी सुरू झाल्या आहेत. मला कोणीतरी म्हटलं.. हे पण…सुरू झाल आहे.. असे हातवारे करत त्यांनी…. तुम्ही कोणत्या रस्त्याने बारामतीकरांना नेत आहात..मी बारामती एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला. कुटुंब म्हणून मी बारामतीला आधार देत आहे. मात्र तुम्ही स्वतःच्या स्वार्था करताबारामतीकरांना चुकीचा रस्ता दाखवताय.अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
बारामतीत अशी पद्धत कधीही नव्हती. सुरुवातीला तुम्हाला बरे वाटेल.! उद्याच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काय होईल. याने सवय लागते. लोक म्हणतील तेव्हा दिले आता काय होतेय..जिल्हा परिषद,तालुका पंचायत, मार्केट कमिटी, विकास सोसायटी, बारामती बँक, पिडीसीसी बँक या निवडणुकीला लोक पैसे मागतील. त्यामुळे ही पद्धत योग्य नाही. असेहीयावेळी म्हणाले.
सध्या भावनिक करायचं काम चालू आहे. दोन-तीन गावांमध्ये पवार साहेबांचे भले मोठे फलक साहेबांचे लावण्यात आले आहेत. आणि त्या फलकावर निवडणूक निशाणी लावण्यात आली आहे. या निवडणुकीत साहेब उभे आहेत का..? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, साहेब उभे होते तेव्हा त्यांना भरघोस मते दिली. सुरुवातीला कमी मते मिळाली. मी कामाला सुरुवात केल्यावर नव्वदच्या निवडणुकीत लाखाच्या फरकाने साहेबांना निवडून दिले. असे ते म्हणाले.
भावनिक होऊ नका.! लोकसभेला साहेबांना तुम्ही खुश केलं..! साहेबांपेक्षा जास्त कामे मी बारामतीत केली आहेत. अर्थात तुम्ही मला पाठिंबा आणि साथ दिली म्हणून मी हे सर्व करू शकलो..! मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं.
दिंगबर पडकर प्रतिनिधी :- बारामती,इंदापूर,दौंड,पुरंदर :- झुंजार, झुंजार नामा, शक्ती झुंजार,ऑनलाईन