पुणे ग्रामीण,दि.१६ भोर आणि राजगडच्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. या मातीचे इमान राखण्यासाठी, येथील प्रत्येक गावांच्या विकासासाठी मी कटीबध्द आहे. जनतेने निवडून दिल्यास भोर, राजगड तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करून मतदारांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करेल.
एक हाक तुमची, साथ माझी, असा विश्वास महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी ग्रामस्थांना दिला. जनतेची कामे करायला मी रोज भोर, राजगडला येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, जीवन कोंडे, संतोष घोरपडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मांडेकर म्हणाले की, भोर, राजगड तालुक्यात पर्यटन क्षेत्रात विकास करून रोजगाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करेन. तालुक्यावर बसलेला मागासलेपणाचा शिक्का पुसन टाकेन.
या वेळी बोलताना रणजित शिवतरे म्हणाले की ” घराणेशाहीला संपवायचं असेल तर शंकर मांडेकर यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. गेली १५ वर्षात जनतेचे काम कोणी केली का ? याचा विचार करून मतदान करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठींबा देण्यात आला. या मेळाव्याला पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, माजी आमदार शरद ढमाले, डॉ. शशिकांत तरंगे, अक्षय शिंदे, शांताराम इंगवले, बाबासाहेब कंधारे, अमित कंधारे, सूर्यकांत कदम, महादेव मारगळे, शंकर मारगळे, भाऊसाहेब मारगळे, शिवाजी ढेबे, बाळासाहेब झोरे, नामदेव हिरवे, संभाजी गावडे, वैशाली सणस, श्रीकांत कदम, अंकुश मोरे, धैर्यशील ढमाले, शंकर मारणे, राजेंद्र दबडे, राजेंद्र गुंड, अरुण राऊत, आनंद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.