पुणे,दि.२४ : – राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. पुणे शहरातील किमान तापमानात झपाट्याने घट झाली असून, गारठा वाढला आहे. पुणेकरांना शनिवारी थंडीचा कडाका जाणवला. पाषाण परिसरात सोमेश्वर वाडी येथील नागरिक शेकोटी करून बसलेले दिसत आहे तर पुण्यात सरासरीपेक्षा जास्त असलेल्या किमान तापमानाचा पारा आता पुन्हा घसरला आहे. पुणे शहरात १२.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली, तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिसरात ११.६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, थंडीचा कडाका पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सरासरीपेक्षा किमान तापमानात दोन अंशांची घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत होता.
राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. एकाच दिवसात किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. हवामान विभागाने वर्तवली आहे.
उपनगरात पारा घसरला
शिवाजीनगर, पाषाण, हवेली या भागातील किमान तापमानाचा पारा १३-१४ अंशांवर नोंदवला जात आहे. काही भागांत किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसइतके आहे. ठराविक अंतरावर किमान तापमानात बदल जाणवून येत आहे.