पुणे,दि.११:- पुण्यातील मिल्स परिसरातील एका पबमधून रविवारी बाहेर पडलेल्या एका भरधाव वाहनाने महिला पुणे शहर पोलिसाला उडवले
दारूच्या नशेत एका चालकाने नाकाबंदी करणाऱ्या आलेले ठिकाणी महिला पोलिसाला उडवल्याचा प्रकार घडला होता. पुण्यातील मिल्स परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.
हि घटना पुण्यातील मिल्स परिसरातील एका पबमधून बाहेर पडलेल्या एका भरधाव वाहनाने महिला पोलिसाला उडवले ची घटना रविवारी मध्यरात्री घडली. नायडू लेन (RTO ऑफिस जवळ) रुबी हॉस्पिटल कडून आरटीओच्या दिशेने जाताना हा प्रकार घडल्याची मिळालेल्या माहिती नुसार दीपमाला राजू नायर असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.
रविवारी मध्यरात्री दीड वाजता भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर गाड्यांची चेक पोस्ट करत असताना पोलीस कर्मचाऱ्याला उडवले होते
याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता
व कारचालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अर्णव पवनकुमार सिंघल (वय २४, रा. जनवाडी, मुळ रा. जिंजर अपार्टमेंट, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे या कारचालकाचे नाव आहे.
एस एस पीएम एस कॉलेज समोर रविवारी रात्रीपासून नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे दीड वाजता एका कारला पोलीस अंमलदार दिपमाला राजू नायर यांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा कारचालकाने बॅरिकेटला धडक देऊन नायर यांना उडवले होते. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी युनिट १, युनिट २ व युनिट ४ यांना तसेच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी समांतर तपास करण्याचे आदेश दिले.
महिला पोलीस अंमलदार नायर यांना जखमी करणारी कार कोरेगाव पार्क येथील हॉटेलमधून आल्याचे दिसून आले. तेव्हा युनिट २ चे पथकाने अपघातील कारचालकाची माहिती काढली. कारचालक हा जनवाडी भागात राहणारा आहे. ही कार खडकी टाईप रेंज हिल्स भागात असल्याची माहिती मिळाली. अपघातातील कार बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे पथकासह जनवाडी भागात पेट्रोलिंग करुन अपघात करणार्या कारचालकाचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अपघात करणारा आरोपी जनवाडी येथून गावी जाणार आहे. लागलीच बातमीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी अर्णव सिंघल याला ताब्यात घेतले.
अपघाताबाबत त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की आम्ही मित्रासह कोरेगाव पार्क येथे पार्टी करण्यासाठी गेलो होतो. पार्टीनंतर घरी जात असताना एस एस पी एम एस कॉलेजवळ पोलिसांनी आमची कार बाजुला घेण्यास सांगितली असता मी तेथे लावलेल्या बॅरिकेटसला धडक देऊन तेथून पळून गेलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेंद्र बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक, दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, प्रताप मानकर, शब्बीर सय्यद, रवींद्र गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कांबळे, तसेच युनिट ४, युनिट २ व युनिट १ चे पथक तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथक यांनी केली आहे.