पिंपरी चिंचवड ,दि.०७ :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात संवाद व्हावा. पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा. मनावरील तणाव कमी व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा वाढदिवस पोलीस ठाणे, शाखा येथे साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे शहर पोलीस दलातून स्वागत केले जात आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात, शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस लक्षात नसतो. कारण त्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्याशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सुट्टी मागण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अधिकारी आणि सुट्टी मागणारे कर्मचारी यांच्यात गैरसमज होतात. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त प्रयत्न करीत आहेत.
सततचा बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. अति ताणामुळे पोलिसांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अनेक वेळेला पोलिसांना आपले वाढदिवस साजरे करता येत नाहीत. पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त चौबे यांनी याची दखल घेतली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा वाढदिवस लक्षात रहावा तसेच समन्वय राखला जावा यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सततचा बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांना आपल्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. अति ताणामुळे पोलिसांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अनेक वेळेला पोलिसांना आपले वाढदिवस साजरे करता येत नाहीत. पोलीस आयुक्त चौबे यांनी याची दखल घेतली आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा वाढदिवस लक्षात रहावा तसेच समन्वय राखला जावा यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आयुक्तांनी सुरु केलेल्या उपक्रमामुळे पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी मिळणार असल्याने त्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येणार आहे. तसेच पोलीस ठाण्यात, शाखेत वाढदिवस साजरा होणार असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील संबंध वृद्धिंगत होतील. या उपक्रमांतर्गत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलीस स्टेशन, शाखेत केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल. त्यानंतर प्रभारी अधिकारी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याला पोलीस आयुक्तांच्या शुभेच्छा संदेशाचे पत्र देतील.