पुणे, दि.2: प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या संयुक्तविद्यमाने अर्जदारांच्या पोलिस पडताळणी संबधीत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जन संवाद सत्राचे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट भवन, सर्वे क्रमांक 5/2/2 बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे येथे बुधवार, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयातीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अर्जदारास पूर्ववेळशिवाय (अपॉइंटमेंट) खुल्या सभागृहात उपस्थित राहता येणार आहे. जनसंवाद सत्रामध्ये उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी त्यांचे तक्रार पत्र (जर असतील तर) तसेच सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणावेत, अशा अर्जदारांनी दुपारी २ वाजता नोंदणीसाठी हजर राहावे, असे आवाहन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.











