पुणे ग्रामीण,दि.२३ :- पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा परिसरातील लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अगरवाल प्रकरणाचा छडा लावत त्याची पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात तपासादरम्यान प्रेमसंबंधातून कट रचून केतनला किल्ल्यावर नेऊन ढकलून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


































