पुणे : पाषाण येथील सोमेश्वरवाडी परिसरातील संध्यानगर, येथे विद्यमान नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांच्या हस्ते रस्त्याच्या नूतनीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ड्रेनेज लाईनचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले असून, रस्त्याच्या कामालाही तत्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कामांतर्गत संध्यानगर ते श्रीनाथ हर्मिटेजमार्गे मुख्य रस्त्यापर्यंत संपूर्ण डांबरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला संध्यानगर, गोल्डन गॅलेक्सी, सोमेश्वर पार्क, श्रीनाथ हर्मिटेज येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























Hahahaha You are so good