पुणे, : पिंपरी-चिंचवडमध्ये जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज उभारण्याच्या संकल्पनेसोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी भव्य ढोल-ताशांचा गजर करण्यात येणार आहे. रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता हा ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती ढोल-ताशा पथक महासंघाचे उपाध्यक्ष अमर भालेराव यांनी दिली.
या उपक्रमात १५१ ढोल-ताशा पथकांमधील सुमारे ५ हजार ढोलवादक सहभागी होणार असून, त्यांच्या सामूहिक वादनातून विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमाला ‘धर्मध्वजाला ऐतिहासिक विश्वविक्रम मानदंड’ देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
‘ढोलांचा निनाद, भगव्याचा मान, विश्वविक्रमासाठी एकत्र येणार महाराष्ट्राचा अभिमान’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ढोल-ताशा पथकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२६ आहे.
हा कार्यक्रम हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड व ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.



























