मुंबई दि. ७ :- बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च-एप्रिल २०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी, १२ वी परीक्षांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से., प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई) तसेच मा. दिनेश डिंगळे (माजी सहसचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई) उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, खजिनदार नागसेन गमरे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच सरचिटणीस राजेश धाडगे सूत्रसंचालनची धुरा सांभाळणार असून शिक्षण समिती अध्यक्ष राजेश पवार हे प्रास्ताविक सादर करणार आहेत आणि शिक्षण समिती चिटणीस अशोक मोहिते हे आभार प्रदर्शन करणार आहेत.
सदर समारंभास उपकार्याध्यक्ष, अतिरिक चिटणीस, चिटणीस, व्यवस्थापक मंडळ, सर्व समित्या त्यांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या पाल्याची गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत समितीकडे सादर करून लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी आणि आपल्या पाल्यासह पालकांनी सदर सत्कार समारंभास उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.




























