पुणे, दि. १९ : – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनात.महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये .महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रस्ते विकासकामे, रस्त्यांच्या कामांचा दर्जा व टिकाऊपणा सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. यावेळी बाणेर रोड व गणेशखिंड रोड वरील मेट्रो मार्ग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेली कामे, प्रलंबित कामे, वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षितता, पदपथ, चौक सुधारणा तसेच युटिलिटी चर व मॅनहोलच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त अभिजित चौधरी, मनोज पाटील, पुणे शहराचे अपर वाहतूक पोलीस आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त विशेष ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पुणे महानगरपालिकेतील संबंधीत विभागाचे खातेप्रमुख तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय ते बालेवाडी या मेट्रो मार्ग क्रमांक ३ वरील रस्ते दुरुस्ती, मध्य दुभाजक तसेच संबंधित विकासकामांच्या गुणवत्तेबाबत मा. महापालिका आयुक्त, मा. जिल्हाधिकारी आणि मा. PMRDA आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली. मध्य दुभाजकांच्या कामांमध्ये योग्य रेषा व पातळीचा अभाव, अपूर्ण फिनिशिंग तसेच देखरेखीचा अभाव निदर्शनास आल्याने संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्य अभियंता,
पथ विभाग
पुणे महानगरपालिका, पुणे



























