पुणे,दि.१९:- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विष्णू शिवाजी कोरेवाड (वय ४४, व्यवसाय बांधकाम) हे म्हाळुंगे येथील ग्रीन व्हिला कॉलनी परिसरात राहतात. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बाजीराव पाडळे चौकाजवळील मोकळ्या जागेत प्लॉटच्या संदर्भात चर्चा सुरू होती.
यावेळी प्लॉट नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी क्रमांक एकने रागाच्या भरात शिवीगाळ करून लाकडी बांबूने तक्रारदार यांना मारहाण केली. तसेच दुसऱ्या आरोपीने हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तक्रारदार यांचा मुलगा विशाल हा त्यांना सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही आरोपी क्रमांक एकने लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपीने, “तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला जिवे मारतो,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लॉटच्या वादातून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात चर्चा सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.




























