श्रीगोंदा,दि१७:- श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/2021 मधील खुनाच्या प्रयत्नासह (IPC 307) विविध कलमांखालील गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी सागर कान्हू काळे (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा) याला श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पोलीसांनी आरोपीचा माग काढत त्याला वेशांतर करून ताब्यात घेतले. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक जी. बी. यादव, पोलीस कॉन्स्टेबल राऊत, दळवी आणि कोहक यांनी पार पाडली.



































