पुणे,दि.११ :- पाषाण टेकडी परिसरात सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष इनामदार (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पाषाणमधील विनेशिया सोसायटीत राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इनामदार हे नेहमीप्रमाणे टेकडीवर चालण्यासाठी गेले होते. चालत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.












