पुणे, दि. २९: पुणे ते सोलापूर महामार्गावरुन थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामाकरिता केडगाव चौफुला येथून ८ जुलै २०२७ रात्री १२ वाजेपर्यंत वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.
थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक केडगाव-चौफुला-न्हावरे मार्गे तळगाव ढमढेरे, शिरुर या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे, नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.




























