• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!

    छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

    पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

    पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

    दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

    पुणे जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
October 31, 2026
in बातम्या
0
पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.३० : – पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-३ (माण–हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेचे लोकार्पण दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे सकाळी १०.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण यांनी शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मार्गिकेवरील प्रत्यक्ष प्रवासी सेवा दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, पुणे मेट्रो लाईन-३ ही २३.२०३ किलोमीटर लांबीची संपूर्णतः उन्नत मेट्रो मार्गिका असून, ती ‘पुणेरी मेट्रो’ आणि ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखली जाते. ही मार्गिका माण येथून सुरू होऊन हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमार्गे पुण्यातील प्रमुख प्रशासकीय आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या शिवाजीनगरला जोडते. भूसंपादन आणि विविध सेवा-सुविधांच्या स्थलांतरासह या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण, २०१७’ अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डीबीएफओटी (संकल्पना, बांधकाम, वित्तपुरवठा, वापर आणि हस्तांतरण) पद्धतीने राबविण्यात येणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे.

पीएमआरडीएसोबत झालेल्या सवलत करारानुसार, टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच यांच्या संयुक्त सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) या विशेष उद्देश कंपनीमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.

या प्रकल्पातील एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके दि. ३ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. यापैकी सात स्थानकांवर एक जिना खुला राहणार आहे. त्यामध्ये स्थानक क्रमांक १ (माण), २ (माण-एमआयडीसी सर्कल फेज-२), ३ (माण-बस डेपो), ५ (हिंजवडी फेज-२ सर्कल-१), ६ (पद्मभूषण चौक), २१ (कृषी महाविद्यालय) आणि २३ (जिल्हा व सत्र न्यायालय) यांचा समावेश आहे. उर्वरित दहा स्थानकांवर दोन्ही जिने प्रवाशांसाठी खुले असतील. त्यामध्ये स्थानक क्रमांक ४ (हिंजवडी फेज-२ सर्कल-२), ७ (श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी), ८ (हिंजवडी फेज-१), ९ (वाकड चौक), १० (श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे), ११ (मिटकॉन, बालेवाडी), १२ (आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी), १७ (औंध), १८ (सकाळनगर) आणि १९ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचा समावेश आहे. उर्वरित सहा स्थानकांपैकी १३ आणि १४ क्रमांकाच्या स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असून, ते नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण होईल. तर १५, १६, २० आणि २२ क्रमांकाची उर्वरित चार स्थानके आणि त्यांचे जिने जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करून प्रवासी सेवेत दाखल केले जातील.

प्रवाशांचा मेट्रोतून उतरल्यानंतरचा पुढील प्रवास सुलभ व्हावा, यासाठी बहुविध वाहतूक व्यवस्थेचे एकत्रीकरण (मल्टिमोडल इंटिग्रेशन) केले जात आहे. त्याअंतर्गत स्थानकाबाहेर पडताच पीएमपीएमएलच्या बसेस, रिक्षा, ॲप-आधारित टॅक्सी (ओला, उबर) आणि ई-बाईक्स उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र प्रवासी चढ-उतार केंद्रे (पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉइंट्स) तयार करण्यात येत आहेत. वाहनांच्या सुरक्षित व्यवस्थेसाठी मेट्रो स्थानकांजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. रस्ते वाहतुकीसोबतच पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र सायकल मार्ग, प्रशस्त पदपथ, पादचारी मार्ग ओलांडण्याची व्यवस्था आणि पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. यामुळे विशेषतः हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

या संपूर्ण मार्गिकेची रेल्वे डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्याकडून तपासणी पूर्ण झाली आहे. माण (पीएमआर-१) ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी (पीएमआर-१२) या १२.६० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला २३ जुलै २०२६ रोजी, तर उर्वरित पाच स्थानकांच्या टप्प्याला २३ सप्टेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) अंतिम सुरक्षा मान्यता मिळाली आहे. स्थानकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे (एमएसएससी) ३५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे, स्थानकांमध्ये मार्ग शोधणे आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ व्हावा, यासाठी आधुनिक प्रवासी माहिती प्रणाली आणि तिकीट व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. महामेट्रोच्या सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका आणि नव्याने सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन-३ वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी संयुक्त ॲप विकसित करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज एकूण ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता स्थापित करण्यात आली आहे. यापैकी ६.१० मेगावॅट ऊर्जा मेट्रो स्थानकांवर, तर १.५० मेगावॅट ऊर्जा कार डेपोमध्ये निर्माण होणार आहे. या हरित ऊर्जेमुळे प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३० टक्के गरज भागवली जाणार आहे. पुणे मेट्रो लाईन-३ वरील सर्व गाड्या सुमारे १०० महिला ट्रेन पायलट चालवणार आहेत. याशिवाय, स्टेशन नियंत्रक, तिकीट कर्मचारी आणि स्टेशन अटेंडंट यांसह एकूण स्थानक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० टक्के महिला असतील. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि आधुनिक वाहतूक क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग याबाबतची कटिबद्धता या उपक्रमातून अधोरेखित होत असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क, औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, गणेशखिंड रस्ता आणि शिवाजीनगर परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज सुमारे दोन ते अडीच लाख नागरिक या मेट्रो सेवेचा लाभ घेतील, असा अंदाजही डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी म्हणाले की, ४ नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालय स्थानकावरून माणच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ११.४० वाजता सुटेल. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) मेट्रो स्थानकावर लाईन-३ ची जोडणी महामेट्रोच्या लाईन-१ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) आणि लाईन-२ (वनाज ते रामवाडी) यांच्याशी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रो आणि लाईन-३ साठी संयुक्त तिकीट ॲप विकसित करण्यात आले आहे. अल्स्टॉमच्या वातानुकूलित मेट्रो गाड्यांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, सीबीटीसी सिग्नलिंग प्रणाली आणि ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. पुण्याचा विकास हा येथील माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक परिसंस्थेशी घट्ट जोडलेला आहे. विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी विनाअडथळा वाहतूक जोडणी महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो लाईन-३ ची रचना माण-हिंजवडीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या आयटी हबला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि कार्यक्षम होईल, असे सैनी यांनी नमूद केले.

पीएमआरडीएच्या मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण म्हणाल्या की, या प्रकल्पाच्या बांधकामात ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग (जीजीबीएस) वापरल्यामुळे सुमारे २८ हजार टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन टळले आहे. तसेच, दोन हजार टन स्टील आणि ६० कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे. मेट्रो स्थानके आणि कार डेपो मिळून ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित करण्यात आली असून, प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी ३० टक्के गरज हरित ऊर्जेतून भागवली जाणार आहे. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या वृक्षांच्या बदल्यात ५,५०० नवीन झाडे लावण्यात आली आहेत. तसेच, ७५० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले असून, त्यांचा जगण्याचा दर ८० टक्के आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकात एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. औंध ते शिवाजीनगर या दिशेचा पूल २० ऑगस्ट २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. शिवाजीनगर–बाणेर आणि बाणेर–शिवाजीनगर या दिशांचे काम पूर्ण झाल्यानंतर ८ मार्च २०२६ पासून या मार्गांवर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाषाण रॅम्पचे काम सध्या प्रगतिपथावर असून, ते डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती रिनाज पठाण यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो स्थानकांजवळ पार्किंगची व्यवस्था विकसित केली आहे. बालेवाडी येथील पीएमआर-११ स्थानकाजवळ अमर टेक पार्क परिसरात सुमारे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, बाणेर येथील पीएमआर-१४ स्थानकाजवळील एबीझेड परिसरात २१ हजार चौरस फूट क्षेत्रावर पार्किंग विकसित करण्यात आले आहे. या सुविधांमुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असेही रिनाज पठाण यांनी सांगितले.
—-

*पुरुषोत्तम सांगळे*
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पीएमआरडीए, पुणे

Previous Post

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!

पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!

October 31, 2026
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

October 30, 2026
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३० लाख ४७ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

October 28, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली- उगले

October 28, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!

पुणे मेट्रो लाईन-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!

October 31, 2026
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट;

October 30, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.