पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे.
इतर उमेदवार :
– सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) – ३ हजार ६६ मते
– सोमनाथ जनार्धन साळुंखे – २ हजार ६३८ मते
– नामदेवराव जाधव – १ हजार ९५५ मते
– लक्ष्मण साहेबराव हरणावळ – १ हजार ४७२ मते




























