पुणे,दि.१५:- भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी १५ ते १९ जून २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ यांसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १५ ते १८ जूनदरम्यान राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, संबंधित कालावधीत राज्यात ऑरेंज अथवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


































