पुणे,दि.२१:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे पोलिस आयुक्तालय आणि ईशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पोलिस मुख्यालयात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील तसेच ईशा फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. शहरातील विविध पोलिस ठाण्यांतील सुमारे 240 ते 250 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगासने आणि प्राणायामाचा सराव केला.
योगाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



































