पुणे, दि. 13: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, आषाढी वारीमध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे आणि अल्पवयीन वाहनचालकांनी तपासणी करावी. वारीमध्ये नियमबाह्य वाहन चालणार नाही, याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना . बावनकुळे यांनी दिल्या.




























