पुणे, दि. २१ :- भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बालाजीनगर पुलाजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातुपते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, शंकर नेवसे, विजय पवार, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, संदिप शिर्के, आशिष यादव, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी केली आहे.




























