मुंबई, दि. २१ : डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करण्यासह छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या डान्सबारचे सखोल सर्वेक्षण करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केली. अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान त्यांनी ही भूमिका मांडली.

२००८-०६ मधील कायद्याच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी ऑर्केस्ट्राचा कायद्यात समावेश केल्याचे स्वागत केले. मात्र, वेट्रेसच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि अल्पवयीन मुलींची तस्करी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोन्हे यांनी पोलिसांनी सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन गुप्त डान्सबार शोधण्यासाठी विशेष सर्वेक्षण करावे आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करून महिलांचे शोषण व मानवी तस्करीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी केली.



























