पुणे दि,१९“रियल हिरो : माझा सफाई सेवक“
आपल्या परिसरातील रस्ते – गल्ली सफाई करणारे हेच खरे आपले हिरो आहेत..मा.पालकमंत्री श्री गिरीष बापट साहेब यांनी आरोग्य कोठी वरील सफाईसेवकांबरोबर फोटो काढले.खरंच एक छोटी कृती – मोठे काम करते .होय ना मग करा आपण ही. परिसरातील सफाई सेवकाबरोबर एक सेल्फी काढा व सोशल मिडीयावर टाका. त्यासोबत लिहा “रियल हिरो : माझा सफाई सेवक“ कारण यामुळे त्यांच्या सेवेचा सन्मान तर होईलच व आपली कृतज्ञता व्यक्त होईल. “स्वच्छता ही सेवा हे खरे ठरेल.” स्वच्छ भारत अभियानमध्ये एक पावूल टाकल्यासारखे होईल. त्याला व आपल्याला आनंद मिळेल. आपला सहभाग पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी हवा आहे. प्रशासनास मदत करा. आपले शहर स्वच्छ ठेवा. ओला व सुका कचरा वेगळा करा. रस्तावर कचरा टाकू नका व इतर ही घाण करू नका ही नम्र विनंती. चला तर मग स्वत:पासून स्वच्छतेची सुरूवात करूया…!
– ज्ञानेश्वर मोळक
सह आयुक्त
घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे मनपा