पुणे, दि.१३:-आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्वामी नारायण मंदिराजवळ सापळा रचून आरोपी अजित सागर कसबे (वय २२, धनकवडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीविरुद्ध सहकारनगर, पर्वती व आंबेगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गोहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

































