पुणे,दि.२७:- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने चंदननगर परिसरात कारवाई करत सुमारे ३ लाख ६५ हजार ३३९ रुपयांचा पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी येथील गोदामावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत रामलाल उर्फ रमेश गायकराम देवासी (रा. धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी) आणि गणेश चंद्रकांत पटवा (रा. वाघोली) यांच्याकडून प्रतिबंधित पान मसाला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, दोन मोबाईल फोन आणि एक मारुती सुझुकी ओम्नी कार असा एकूण ३,६५,३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या ,अमितेश कुमार , सह.पोलीस आयुक्त . संजय दराडे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्रीमती तेजस्वी सातपुते , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , गौहर हसन , सहा पोलीस आयुक्त गुन्हे ३. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने , सहा.पोलीस निरीक्षक अफरोज पठाण , नितीनकुमार नाईक , पोलीस अंमलदार योगेश कुंभार , विनोद निंभोरे , पृथ्वीराज पांडुळे , सतिश चव्हाण , संदिप देवकाते , सुनिल महाडीक , गणेश गोसावी , प्रशांत कळसकर , अमोल सोनवणे , शरद धांडे , देविदास वांढरे , महिला पोलीस अंमलदार सुरेखा साबळे , सुकेशिनी आंबले , शुभांगी म्हाळसेक




























