पुणे,दि.२१ : – चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या प्रकरणी बँक खातेदार व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मार्च २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून देशातील विविध राज्यांतील पाच नागरिकांची आर्थिक फसवणूक करून मिळालेली ३१ लाख २ हजार रुपयांची रक्कम कोटक बँकेच्या खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात संबंधित खात्याचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार मोनाली लिंभोरे यांनी फिर्याद दिली असून, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शीतल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




























