पुणे,दि.१९ : – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-7 अंतर्गत सुरू असलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेत लोहगाव येथे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूच्या साठ्यावर धाड टाकून सुमारे ₹5.17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत मारुती स्विफ्ट कारसह प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून सुनील संभाजी खांदवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, COTPA आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PSI राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास लोहगाव पोलीस करीत आहेत.



























