पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आंबेगाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून २ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे बनावट ग्राहकाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अटक आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, इम्रानखान नदाफ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक व वैशाली इंगळे यांनी केली आहे.




























