पुणे,दि.२५ :- पुणे शहरातील चतु:श्रीगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सुमारे रू 88 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड याला रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे यु. ए. इ. मधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
APS Wealth Ventures LLP या कंपनीमार्फत जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींना परदेशातून भारतात आणण्यासाठीही कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



























