पुणे,दि.२९ : – बाणेर लिंक रोड परिसरातील एका घरात घरकाम करणाऱ्या अनोळखी महिलेने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर लिंक रोड येथील ‘द अॅड्रेस सोसायटी’मधील एका रहिवाशाच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील लाकडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ₹१५,००० रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ₹१.१० लाखांचा ऐवज चोरून नेला.
ही चोरी १० मे २०२६ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. आरोपी महिला अद्याप अटक नसून तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी हे करीत आहेत.




























